वेबिनार ९

अनेकदा संवादातून problems निर्माण होतात वा solve होतात. म्हणूनच संवादकौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. श्री.प्रल्हाद पै म्हणतात, संवाद हे एक कौशल्य आहे. त्यातून माणसं जोडण्याची कला अवगत झाली पाहिजे व संवाद हा सुसंवाद झाला पाहिजे. आपले यश, उत्कर्ष सर्वांवर अवलंबून आहे. संवादातून तुम्ही लोकांची मन दुखवता की जोडता हे महत्वाचे आहे.

संवादाचे external व internal communication असे दोन प्रकार आहेत. त्यातील internal communication या विषयावर वेबिनारमध्ये श्री.प्रल्हाद पै यांनी मार्गदर्शन केले. Internal communication म्हणजे आतून (internally) सर्वांशी संवाद साधणे. हे स्पष्ट करताना श्री.प्रल्हाद पै अंतर्मन व बहीर्मनचे शास्त्र उलगडून सांगतात.

आपल्या सर्वांचे अंतर्मन चैतन्यशक्तीच्या स्वरुपात एकमेकांशी जोडलेले आहे. आपण इतरांबद्दल जे बरे-वाईट, शुभ-अशुभ विचार करतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचतात. म्हणूनच आपण सर्वांबद्दल चांगले विचार केले की सर्वजण आपला विचार करतात. अंतर्मन एकमेकांना बरोबर ओळखते आणि प्रतिसाद देते. ऑफिस मध्ये बहुतेकांना तेथील राजकारण, निंदा नालस्ती यांना सामोरे जावे लागते. अशावेळी राजकारणा पासून दूर पळून न जाता अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करून परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य आपल्याच विचारात आहे, असे श्री.प्रल्हाद पै म्हणतात.

आपण जे विचार मनामध्ये घोळवतो त्यातून आपल्या मनात विचारांचा एक आराखडा (pattern) तयार होतो. त्यातून एक comfort zone तयार होतो. ‘माझे विचार इतकेच’ अशी एक लक्ष्मण रेखा तयार होते. परंतु आपल्याला जर उत्कर्ष साधायचा असेल तर comfort zone मोठा करून लक्ष्मण रेषेच्या बाहेर आले पाहिजे. नेहमी मोठा विचार करा. इच्छाशक्ती पेक्षा कल्पनाशक्ती अधिक मोठे आहे. आपल्या मोठ्या विचारांना जेव्हा भावना व कल्पना यांचे खतपाणी मिळते तेव्हा तो विचार अंतर्मनात अधिक खोलवर रुजतो.

अशाप्रकारे अंतर्मनाचे शास्त्र आपले विधायक विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी नेमके काय आणि कसे करायचे हे अधिक जाणून घेऊया…या वेबिनार मधून….

WordPress Lightbox Plugin