वेबिनार ४

‘How to meet goals’ याबद्दल मार्गदर्शन करत असताना श्री.प्रल्हाद पै “Communication Skills” चे महत्व अधिक स्पष्ट करून सांगतात.
आपण दिवसभरात असंख्य विचार करतो, तितक्याच प्रमाणात आपण सर्वांशी संवाद साधत असतो, म्हणून संवादाला खूप महत्वाचे स्थान आहे. आयुष्यात जर top ला जायचे असेल तर संवादावर प्रभुत्व मिळवणे गरजेचे आहे.

संवादात content व intent हे दोन भाग असतात. बोलताना content 15% व intent 85% असतो म्हणून संवाद साधताना व्यक्तीच्या देहबोलीतून, हावभावातून आपण हेतू समजून घेतला पाहिजे. समोरील व्यक्तीचा हेतू समजून घेऊन आपण संवाद साधला तर तो संवाद यशस्वी होतो. संवाद साधताना प्रतिसाद (response) देणे खूप महत्वाचे आहे. हा प्रतिसाद विचारपूर्वक (thoughtful) असला पाहिजे. संवाद हा फक्त तोंडाने करण्याची गोष्ट नाही. आपण डोळ्यानी बोलतो, हाताने बोलतो, संपूर्ण शरीराने बोलतो, हृदयाने बोलतो; म्हणून बोलताना शब्द छान पाहिजेत, विचार चांगले पाहिजेत व मनापासून, हृदयापासून बोलले पाहिजे.

सध्याच्या युगात तंत्रज्ञानाचा वापर आपण communication साठी करतो. त्यात फक्त शब्द असतात, भावना नसतात, त्यामुळे सध्याचे SMS, email हे छान असले तरी संवाद होणे खूप आवश्यक आहे.

संवाद साधताना ऐकण्याला (Listening) देखील खूप महत्व आहे. अर्धवट ऐकण्यामुळे अनेकदा गैरसमज निर्माण होतात. यासंदर्भात Chinese Whisper या खेळाचे उदाहरण श्री.प्रल्हाद पै देतात. Listening म्हणजे Understanding. त्यामुळे संवादकौशल्य म्हणजे आपण किती बोललो हे नसून आपण इतरांना किती समजून घेतले हे होय. सद्गुरू श्री.वामनराव पै यांनी विश्वप्रार्थनेच्या माध्यमातून “सर्वांना” हा शब्द हृदयात रुजवला; कारण सर्वांना समजून घेणे, ऑफिसमध्ये, कुटुंबात, समाजात सर्वांना सोबत घेऊन काम करणे हिताचे आहे.

आपण जितके करीअर मध्ये उच्च पदाला जातो तितके व्यक्तीव्यक्तींममधील (interpersonal relations) संबंध आपल्याला सांभाळावे लागतात. ते नेमके संवादाच्या माध्यमातून कसे सांभाळायचे हे जाणून घेऊया या वेबिनारच्या माध्यमातून.

WordPress Lightbox Plugin