वेबिनार ३१

प्रस्तुत भाग या सिरिजचा अखेरचा भाग आहे. या सिरिजला जगभरातून लाखोंच्या संख्येने प्रतिसाद मिळाला, याबद्दल श्री प्रल्हाद पै यांनी वेबिनारच्या प्रारंभी सर्व प्रेक्षकांची कृतज्ञता व्यक्त केली.

वर्क-लाइफ बॅलन्स कसा साधायचा, हा प्रश्न आजकाल प्रत्येकासमोर आहे. यासंदर्भात गेल्या 30 वेबिनारमधून श्री. प्रल्हाद पै यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. हा समतोल साधत असताना आपण करिअर, कुटुंब, सामाजिक जीवन, समाजकार्य व शरीर या सर्वांना समान महत्व दिले पाहिजे. हे सर्व साध्य करण्यासाठी जीवन जगण्याची कला आत्मसात करणे आवश्यक आहे. हा समतोल साधत असताना आपण जन्माला का आलो, हेदेखील माहित असावे. आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. आनंद, सुख ही मिळविण्याची गोष्ट नाही. इतरांना तो देण्याचा प्रयत्न केला की निसर्गनियमांप्रमाणे आनंद, सुख आपल्यालाही शतपटीने मिळते.

करिअरमध्ये आपल्या कामातून इतरांना आनंद दिला पाहिजे. कुटुंबामध्ये एकमेकांना quality time कसा द्यावा, याचे उत्तर देताना श्री. प्रल्हाद पै सुखी जीवनाचे पंचशील सांगतात. ते म्हणजे- सहवास, स्पेस, स्पर्श, संवाद, सन्मान.

आजकाल अनेकजण करिअर व कुटुंब सांभाळण्यातच आपली धन्यता मानतात. हे पूर्णत: चुकीचे आहे. करिअर, कुटुंबासोबतच समाजालाही आपल्या जीवनात महत्वाचे स्थान आहे. समाजाचे अनेक ऋण आपल्यावर असतात, हे सदैव लक्षात ठेवून ‘ जीवनविद्या मिशन ‘ सारख्या सामाजिक संस्थेशी संलग्न होऊन काम केले पाहिजे. समाजकार्याच्या माध्यमातून समाजाला आनंद देण्याचा प्रयत्न केला, की जीवन सर्वार्थाने सुखी होते कारण; ‘ देण ‘ हे सुखी जीवनाचे गुपित आहे. घेण्यात stress आहे व देण्यात grace आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता मनापासून सर्वांना आनंद देण्याचा प्रयत्न करा, असा सुंदर संदेश श्री. प्रल्हाद पै वेबिनारच्या माध्यमातून देतात.

WordPress Lightbox Plugin