वेबिनार ३०

Work life Balance या विषयाचा उलगडा करताना relationship मध्ये माणसे जोडणे का महत्वाचे याचे स्पष्टीकरण श्री.प्रल्हाद पै वेबिनारमध्ये करतात. कृतज्ञता हे जीवनविद्येचे सार आहे. ही साधना मनापासून केल्यास आयुष्यात सर्व काही प्राप्त होते.

कृतज्ञता ही शक्ती आहे, युक्ती आहे. आपल्याकडे जे आहे, ज्यांच्यामुळे आहे, जे पाहिजे आहे या सर्वांबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे. कृतज्ञतेतून आपली प्रगती होते, उत्कर्ष होतो. किंबहुना ज्याची कृतज्ञता व्यक्त करू त्याच क्षेत्रात आपली प्रगती होते. यापुढे श्री.प्रल्हाद पै सांगतात ‘कृतज्ञता हे शहाणपण आहे’. आपल्याला ज्यांच्यामुळे काही मिळालं अथवा मिळेल अशा सर्व लोकांशी कृतज्ञ राहून चांगले संबंध ठेवल्यास भविष्यात हे सर्व लोक मदतीसाठी सदैव तत्पर असतात. हेच खरे शहाणपण आहे. कृतज्ञता व्यक्त करताना आपण त्या व्यक्तीने आपल्यासाठी जे जे चांगले केले त्याचीच आठवण ठेवली पाहिजे. इष्ट गोष्टींचे चिंतन अट्टहासाने करून सर्वांबद्दल कृतज्ञ राहावे.

माणसे जोडण्याचे अफाट सामर्थ्य कृतज्ञतेत आहे. अशाप्रकारे शत्रूलाही एक चांगला मित्र बनवण्यासाठी कृतज्ञता हे एक चुंबक आहे. तसेच कायमस्वरूपी यश टिकवून ठेवण्याचा मार्गही कृतज्ञताच होय. अनेक माणसे शून्यातून विश्व निर्माण करतात. हे लोक यशस्वी होण्यामागचे कारणही कृतज्ञता हेच आहे. अनेक माणसे कंपनीला विविध कारणांसाठी दोष देतात, नोकरीत प्रमोशन न मिळाल्याने कामाचा द्वेष करतात; परंतु कंपनीशी आपण कृतज्ञ का राहिले पाहिजे याचे सुंदर स्पष्टीकरण श्री.प्रल्हाद पै करतात. कंपनी मध्ये कसे वागावे, हे सांगत असताना ते म्हणतात, ‘It is not enough that I win but my competitor should lose’ ही वृत्ती अत्यंत वाईट असून आपण आपल्या क्षेत्रातील प्रतिस्पर्धी (competitor) बद्दल कृतज्ञ असले पाहिजे.

एकूणच कृतज्ञता हा आपला स्वभावधर्म झाला पाहिजे व जे भविष्यात मदत करतील अशा लोकांचीही advance मध्ये कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. अशा या कृतज्ञतेचे महत्व अधिक जाणून घ्या वेबिनारमधून….

WordPress Lightbox Plugin