वेबिनार ३

How to set goals यांचे मार्गदर्शन करताना श्री.प्रल्हाद पै vision चा उल्लेख करतात. Vision नेहमी व्यापक व विधायक असावे. हे vision साध्य करण्यासाठी ठरविलेले छोटे गोल्स “SMART” असणे आवश्यक आहे. “SMART” गोल्स म्हणजे;
Specific, Measureable, Achievable, Realistic & Time Bound.

अनेक लोकांची पैसा, प्रसिद्धी मिळवणे हेच आपले ध्येय अशी समजूत असते. या गोष्टींच्या मागे लागणे म्हणजे ध्येय नसून ते वेड (craze) आहे. म्हणून ध्येय व वेड यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. अनेक मुली करीअर करत असताना घर, संसार, लग्न याकडे दुर्लक्ष करतात; मात्र योग्य वेळी विवाह करून मुलींनी सर्व जबाबदार्‍या सांभाळून करीअर करणे हिताचे आहे. यामध्ये पतीने आपल्या पत्नीला तिची आवड, करीअर जोपासण्यासाठी मदत केली पाहिजे. किंबहुना लग्नानंतर दोघांनी एकमेकांना करीअर मध्ये पुढे जाण्यासाठी मदत केली पाहिजे.

ध्येयाच्या संदर्भातील विविध पैलूंचे स्पष्टीकरण करून ते साध्य करण्यासाठी नेमके काय करावे, (how to meet the goals) याचे उत्तर देताना श्री.प्रल्हाद पै पुढील गोष्टी सांगतात;
1) तीव्र इच्छाशक्ती (Passion)
2) हुशारी (Talent)
3) कौशल्य (Skills)
4) कष्ट
5) मनाचे सामर्थ्य
6) नातेसंबंध (Relationship)

ध्येय साध्य करण्यासाठी Passion व Talent कसे महत्वाचे हे सांगताना श्री.प्रल्हाद पै communication व listening या soft skills बद्दल मार्गदर्शन करतात. संवाद व ऐकणे या कला आहेत. अनेकदा संवाद साधत असताना त्यातून वादविवाद निर्माण होतात. मात्र संवाद, सुसंवाद होणे अपेक्षित आहे कारण सुसंवादाचा संबंध यशस्वी नातेसंबंधांशी असतो; म्हणून communication, listening सारखे अनेक soft skills आपण कसे विकसित कसे करायचे हे जाणून घेऊया या वेबिनरमधून.. How to meet goals…

WordPress Lightbox Plugin