वेबिनार २६

सध्याच्या धावपळीच्या युगात नोकरीधंदा व जीवन (work and life) यांचा समतोला कसा साधायचा हा प्रश्न प्रत्येकाला असतो. श्री. प्रल्हाद पै वेबिनारच्या माध्यमातून Work Life Balance या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणतात, ‘मानवी जीवन सर्वांगाने सुखी समाधानी यशस्वी व आनंदी होण्यासाठी “शहाणपण” या गोष्टीची नितांत आवश्यकता असते.’

सद्गुरू श्री. वामनराव पै यांनी सांगितललेली शहाणपणाची ६ मूल्ये म्हणजे मानवी संस्कृतीची जीवनमूल्येच आहेत. ती म्हणजे समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान, कृतज्ञता.

या सहा मूल्यांपैकी तिसरे मूल्य म्हणजे सामंजस्य. सामंजस्य म्हणजे इतरांना समजून घेणे. कौटुंबिक, कॉर्पोरेट व सामाजिक स्तरावरील ९९% समस्यांचे मूळ कारण ‘गैरसमज’ हे होय. विविध स्तरावर माणसे जेव्हा एकत्र येतात तेव्हा खरंतर त्यांचे अहंकार एकत्र येतात. अशावेळी आपण दुसर्‍यांचा अहंकार जपला पाहिजे. अनेकदा आपण समस्या निर्माण झाल्यावर ती कशी सोडवता येईल, याकडे लक्ष्य देण्यापेक्षा ती कोणामुळे निर्माण झाली, यालाच जास्त महत्व देतो. मात्र एकमेकांना समजून घेत स्वतःचे व पर्यायाने सर्वांचे हित जपण्यात खरे शहाणपण आहे.

सामंजस्याचा दुसरा पैलू म्हणजे तडजोड. तडजोड म्हणजे माघार घेणे नव्हे. तडजोड ही एक शक्ती आहे. ती एक युक्ती आहे. विजयासाठी घेतलेली एक स्टेप (पायरी) म्हणजे तडजोड. अनेकदा दीर्घकालीन सुखासाठी थोडीशी माघार घ्यावी लागते; मात्र तडजोड करण्यात अपयश नाही. तर यात win all ही वृत्ती असली पाहिजे. Perfectionist होताना ही तडजोड कुठे व का करणे आवश्यक आहे याचेही स्पष्टीकरण श्री. प्रल्हाद पै या वेबिनारमध्ये करतात. शहाणपणाचे चौथे मूल्य म्हणजे सहिष्णुता सहिष्णुता म्हणजे सहनशक्ती. जर आपल्याकडे सहनशक्ती नसेल तर आपण आयुष्यात अनेक गोष्टींना मुकतो. या संदर्भातील एका हृदयद्रावक उदाहरणाचा समावेश या वेबिनारमध्ये केला आहे. अनेकदा आपल्याला इतरांचं यश, समृद्धी, सुख पाहवत नाही; मात्र आपल्याला इतरांचं सुख, समृद्धी, मत (opinions) स्वीकारता आले पाहिजे. हा सहिष्णुतेचा आगळावेगळा पैलू श्री. प्रल्हाद पै उलगडून दाखवतात. सामंजस्य व सहिष्णुतेचे विविध पैलू जाणून घेऊया श्री प्रल्हाद पै यांचा वेबिनार मधून…..

WordPress Lightbox Plugin