वेबिनार २१

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे दैवत. शिवजयंतीच्या निमित्ताने श्री.प्रल्हाद पै प्रस्तुत वेबिनार मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देतात.
सर्व गुण, कर्तुत्व, योग्यता, समता, सर्वांना सामावून घेण्याची व राज्यकारभार सांभाळण्याची शक्ती शिवाजी महाराजांकडे होती. जीवनविद्येची सर्व तत्वे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात वापरली म्हणून ते जीवनविद्येचे दैवत आहेत, आदर्श आहेत.

Relationship अधिक सुदृढ करण्यासाठी ६ जीवनमूल्ये किती महत्वाची आहेत व ती दैनंदिन जीवनात काशी वापरली पाहिजे हे आपण गेल्या वेबिनारमधून ऐकत आहोत. त्यातील पहिले मूल्य समता. ही समता समदर्शनात आहे. सर्वांकडे पाहण्याची दृष्टी समान, निर्मळ, नम्रतेची असली पाहिजे. पण त्यासोबत प्रत्येकाला त्यांच्या योग्यतेप्रमाणे मान सन्मान दिला पाहिजे. शहाणपणाचा दूसरा पैलू म्हणजे सभ्यता. याचे विविध कंगोरे वेबिनारमध्ये समजतात. आजही स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन विकृत आहे. कंपन्यांमध्ये स्त्रीला शिफ्टमध्ये काम करावे लागते व रात्री अपरात्री घरी जाताना तिला कोणत्याही संरक्षण देण्यात येत नाही. हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. स्त्री सन्मान हे सभ्यतेचे पहिले लक्षण आहे. म्हणून तिला योग्य सन्मान देत तिचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.

सभ्यतेचा दुसरा पैलू म्हणजे श्रमप्रतिष्ठा. आपल्या देशात श्रमप्रतिष्ठा हा प्रकार गौण आहे. शेतमजूर, कामगार यांना अत्यंत कमी पगार व उच्च-पदस्थ व्यक्तींना गल्लेगठ्ठ पगार यामुळे आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. श्रमाला कवडीमोल किंमत आहे आपणही अनेकदा भाजीवाले, कारागीर अशा अतिश्रम करणार्‍या लोकांना पैसे देण्यास मागे-पुढे पाहतो. व इतर ठिकाणी पैशाची उधळपत्ती करतो. म्हणूनच श्रमाला आपण सर्वांनी प्रतिष्ठा मिळवून देऊ.

अशा प्रकारे सर्व लोकांकडे पाहताना समतेची दृष्टी हवी व कृती करताना ती सभ्यतेची हवी, हे नेमके कसे साध्य कारायचे ते जाणून घ्या प्रस्तुत वेबिनारमधून.

WordPress Lightbox Plugin