वेबिनार १६

सद्गुरू श्री.वामनराव पै यांनी निर्माण केलेली जीवनविद्या आपल्याला जीवन जगण्याची कला आत्मसात करण्यास शिकवते. आयुष्यात निर्माण होणार्‍या विविध समस्यांना स्वयंसूचना व विश्व प्रार्थना यांच्या साहाय्याने दूर करून आपले संपूर्ण व्यक्तिमत्व positive व harmonious करू शकतो.

प्रस्तुत वेबिनार मध्ये ‘दैनंदिन जीवनात work-life balance’ होत नाही असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना श्री.प्रल्हाद पै म्हणतात; मला जमत नाही, जमणार नाही असा नकारात्मक विचार आपण मनात लगेच घट्ट पकडतो, म्हणूनच अट्टहासाने साकारात्मक विचार करून जीवनविद्याचे तत्वज्ञान नियमित आचरणात आणून आपण work life balance करू शकतो.

श्री.प्रल्हाद पै यांनी सुचवलेल्या भल कर च्या साधनेमुळे ऑफिस मधील वातावरण फार छान होऊ लागेल. सर्वत्र व्यवस्था होऊ लागली, असे अनुभव अनेकांना आले. आपल्या इच्छा, संकल्प पूर्ण व्हावेत असे प्रत्येकाला वाटते. या संदर्भात visualization technique बद्दल मार्गदर्शन श्री.प्रल्हाद पै प्रस्तुत वेबिनार मधून करतात. आपला संकल्प आपल्या डोळ्यांसमोर सतत दिसला पाहिजे. त्यावर focus करता आला पाहिजे. किंबहुना तो संकल्प डोळे उघडे ठेवून आपल्याला visualize करता आला पाहिजे. हे visualization म्हणजे नेमके काय? दिवास्वप्न व visualization यातील फरक ही श्री.प्रल्हाद पै सांगतात.

Visualization मध्ये आपला संकल्प पूर्ण झाला आहे, अशा भावात आपण राहिले पाहिजे. आपला संकल्प आपल्या अंतर्मनात मुरविण्यासाठी हे visualization सकाळी उठल्यावर ५ मिनिटे व रात्री झोपताना करणे हितकारक ठरते. व हे सर्व करताना सतत सकारात्मक राहणे महत्वाचे आहे. परंतु सतत positive राहणे, सकारात्मक दृष्टी ठेवणे, फार कठीण आहे. हे नेमके साधण्यासाठी श्री.प्रल्हाद पै विश्व प्रार्थनेचा उपाय सुचवतात.

आपले शरीर, मन आजूबाजूचे जग सुदृढ, निरोगी, निर्मळ करण्याचे महत्वाचे कार्य ही विश्वप्रार्थना करत असते. या विश्वप्रार्थनेच्या माध्यमातून आपण स्वयंसूचना आपल्या अंतर्मनाला देऊ शकतो. हे सर्व नेमके कसे साधायचे हे जाणून घ्या वेबिनार मधून…

WordPress Lightbox Plugin