वेबिनार १५

बहिर्मन व अंतर्मन यांचा वापर करून आपण आयुष्यात यश, सुख कसं मिळवायचं हे आपण मागील वेबिनार मधून पाहिले.

चैतन्यशक्ती आपल्यात अंतर्मन बहिर्मन या स्वरुपात नांदत असतो. त्यामुळे बहिर्मनाने मागायचे आणि अंतर्मनाने द्यायचे अशी व्यवस्था आपल्या आत परमेश्वराने करून ठेवली आहे. आपल्या इच्छा, आकांक्षा अंतर्मनात रुजवण्यासाठी बहिर्मन व अंतर्मनाचे भावनिक ऐक्य महत्वाचे आहे. हे भावनिक ऐक्य साधण्यासाठी अंतर्मनावर दृढ श्रद्धा हवी व या अंतर्मनाला सतत स्वयंसूचना दिली पाहिजे. ही स्वयंसूचना सकारात्मक, विधायक, सर्वांसाठी उपयुक्त व निसर्गनियमांशी सुसंगत असणे आवश्यक आहे. ही स्वयंसूचना मन शांत असलेल्या अवस्थेत पटकन अंतर्मनात मुरते. त्यासाठी नेमके काय केले पाहिजे, याचे मार्गदर्शन श्री.प्रल्हाद पै वेबिनार मध्ये करतात.

स्वयंसूचनेसोबतच स्मरण व कल्पना यांचेही महत्व ते अधोरेखित करतात. आपण फक्त इच्छा केली पण त्याला कल्पना व भावना यांची जोड दिली नाही तर या इच्छा फळू शकत नाही म्हणूनच imagination ला फार महत्व आहे. आपण केलेली विधायक इच्छा पूर्णच झाली आहे, अशा भावात जर आपण राहिलो व सतत मनाला स्वयंसूचना दिली तर सर्व काही साध्य होऊ शकते. इतकी दिव्य शक्ति आपल्या अंतर्मनात वास करून आहे.

Visualization व स्वयंसूचना यांचे theory ज्ञान ऐकणे व वाचणे खूप सोपे आहे; मात्र प्रत्यक्षात ते साध्य करणे कठीण आहे. या साठी श्री.प्रल्हाद पै विश्वप्प्रार्थनेचा मार्ग सुचवतात. सर्वांच्या कल्याणाचा विचार करणार्‍या विश्वप्रार्थनेच्या माध्यमातून आपण बहिर्मन व अंतर्मनाचे भावनिक ऐक्य मोठ्या सहज साध्य करू शकतो. हे नेमके कसे? …ते जाणून घ्या या वेबिनार मधून…..

WordPress Lightbox Plugin