वेबिनार ११

मागील वेबिनार मध्ये बहिर्मन व अंतर्मन म्हणजे काय व ते कशाप्रकारे कार्य करतात, हे आपण पाहिले. जेव्हा बहिर्मन व अंतर्मनाचे भावनिक ऐक्य होते तेव्हा विचार आपोआप बहिर्मनातून अंतर्मनात जातात व जीवनात साकार होतात. आपल्या सर्व इच्छा, संकल्प पूर्ण करण्याचे सामर्थ्य अंतर्मनात आहे. यासाठी बहिर्मनाला जे वाटतं ते अंतर्मनाला पटणे आवश्यक आहे.

‘मला हे कसं मिळणार’ अशी नकारघंटा (नकारात्मक स्वर) सतत असल्यामुळे आपल्या अनेक इच्छा आकांक्षा अंतर्मांत जाण्यास अडथळे येतात. म्हणूनच आपल्या मनोकामना, इच्छा अंतर्मनात मूळ धरण्यासाठी पुढील गोष्टी करण्यास श्री.प्रल्हाद पै सांगतात;
1) Repeated Autosuggestion
2) Visualization
3) Behave as if it is done.
या तीन गोष्टींचे स्पष्टीकरण श्री.प्रल्हाद पै प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात देतात.

वेबिनारमध्ये रशियातील एका मुलाने अंतर्मनावर विश्वास बसण्यासाठी काय करावे, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना श्री.प्रल्हाद पै अंतर्मनाच्या शक्तीचे महत्व सांगतात. आपण लहान लहान गोष्टी अंतर्मनावर test केल्या, एखादी गोष्ट मिळाल्यास त्याचे आनंद साजरे केल्या की आपला अंतर्मनावरील विश्वास अजून वाढत जातो.अंतर्मनावर विश्वास टाकला की आपल्याला मार्गदर्शन करण्याचे काम अंतर्मन आपोआप करते.

त्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणार्‍या तरुणीने आपल्या काही समस्या ईमेलच्या माध्यमातून विचारल्या. इतरांबद्दल केलेला negative नकारात्मक विचार स्वत:च्याच विचार शक्तीतून निर्माण झाल्यामुळे त्याचे विपरीत परिणाम आपल्यावरच होतात. त्यामुळे positive विचार करणे, इतरांबद्दल कृतज्ञ राहणे हितकारक आहे, असे श्री.प्रल्हाद पै उत्तर देताना सांगतात. आपण आपल्या कामाबद्दल, कंपनी बद्दल सदैव कृतज्ञ राहून माणसे जोडण्याची कला अवगत करणे गरजेचे आहे. कंपनी मध्ये न मिळणारे promotion, चांगली नोकरी न मिळणे, कंपनी मध्ये असणारे राजकारण अशा विविध समस्यांना सामोरे कसे जायचे व वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार कसा द्यायचा, याचेही मार्गदर्शन प्रस्तुत वेबिनारमधून केले आहे.

WordPress Lightbox Plugin