वेबिनार १०

आपण सर्वजण अंतर्मनाने एकमेकांशी जोडलेलो आहोत. आपले अंतर्मन खूप शक्तीशाली, दिव्य प्रतिभाशाली (Infinite Intelligence) आहे. ही शक्ती अंतर्मनात येते कुठून? याचे उत्तर श्री.प्रल्हाद पै प्रस्तुत वेबिनार मध्ये देतात.

प्रत्येकाकडे चैतन्यशक्ती असून ती एक आहे. ही चैतन्यशक्ती वेगवेगळ्या रूपात प्रगट झालेली आहे व ती प्रत्येकात अंशरूपाने आहे. अशाप्रकारे आपण सर्वजण चैतन्यशक्तीने एकमेकांशी जोडलेले आहोत. अंतर्मन is manifestation of God. ही दिव्य प्रतिभाशक्ती अर्थात चैतन्यशक्ती आपल्याकडे अंतर्मनरूपाने असल्यामुळे अशा या अंतर्मनात आपण जे विचार रुजवतो तेच आपल्या जीवनात साकार होतात. म्हणूनच सद्गुरू श्री.वामनराव पै म्हणतात, ‘विचार तसा जीवनाला आकार’. अंतर्मनावर दृढ श्रद्धा ठेवण्यासाठी स्वयंसूचनेचे तंत्र फार उपयुक्त आहे; परंतु हे करताना अनेकदा अंतर्मनातून नकारात्मक आवाज (negative noise) येत असतो. हा नकारात्मक आवाज पूर्णपणे बंद करण्यासाठी पुढील तीन गोष्टी करण्यास श्री.प्रल्हाद पै सांगतात;
१) अंतर्मनावर विश्वास ठेवणे.
२) सतत आशा (hopes) ठेवणे.
३) जे हवे ते मिळविण्यासाठी योग्य दिशेने विधायक प्रयत्न करणे.

अंतर्मनाचा pattern बदलण्यासाठी स्वयंसूचना सकारात्मक (positive) दिल्या पाहिजेत. ही स्वयंसूचना म्हणजे नेमके काय, त्याच्या साहाय्याने आपल्या विधायक इच्छा अंतर्मनात कशा मुरतात हे जाणून घेण्यासाठी ऐका…..प्रल्हाद पै स्पीक्स वेबिनार

WordPress Lightbox Plugin