वेबिनार ८

संवादकौशल्यामध्ये नेहमी बाह्य (External) संवादाबद्दल च संगितले जाते. परंतु अंतर्गत संवाद (internal communication) याबद्दल अनेकजण अनभिज्ञ असतात. किंबहुना कोणत्याही पुस्तकामध्ये अंतर्गत संवादाचा (internal communication) उल्लेख नाही. या संवादाचे मार्गदर्शन करणारे जीवनविद्या हे एकमेव ठिकाण आहे.

Internal communication म्हणजे अंतर्मनाशी संवाद. संवाद हा बोलण्यापुरता मर्यादित नाही. तर विचार, उच्चार व आचार या स्तरावर आपण लोकांशी संवाद साधत असतो. आपण स्पर्शातूनही संवाद साधतो. दु:खाच्या प्रसंगी खांद्यावर ठेवलेल्या हाताचा स्पर्श आपल्याला आधार वाटतो ;तर थोबाडीत मारताना झालेल्या स्पर्शातून राग व्यक्त होत असतो. असे हे स्पर्शाचे महत्व आदरणीय श्री.प्रल्हाद पै वेबिनारमधून स्पष्ट करतात.

आपण मनात जे विचार करतो त्याचे स्पंद दुसर्‍यांपर्यंत पोहोचतात त्यामुळे (communication) संवादाच्या दृष्टीने मनाचे महत्व फार आहे. मनाचे बहिर्मन, अंतर्मन व दिव्यमन हे 3 प्रकार असून ते एकाच मनाचे भाग आहेत. बहिर्मन व अंतर्मन यांची तुलना करताना श्री.प्रल्हाद पै हिमनगाचे उदाहरण देतात. बहिर्मन शरीराशी व अंतर्मन ईश्वरी शक्तिशी जोडले गेले आहे. त्यामुळे बहिर्मनातून युक्तीने आपण एखादा विचार अंतर्मनात रुजवल्यास तो विचाऱ आपल्या जीवनात साकार होतो. याचे प्रमुख कारण म्हणजे आपण सर्वजण, ब्र्म्हांडात भरूनही उरलेल्या चैतन्यशक्तीचाच एक भाग आहोत हे स्पष्ट करताना श्री.प्रल्हाद पै वीजेचे उदाहरण देतात.

अंतर्मनाने आपल्या सर्वांना चैतन्यशक्तीचे बटण दिले आहे. एखाद्या माणसाचे स्मरण केले की आपण त्या माणसाशी जोडले जातो. अशा या स्मरणयोगाचा उल्लेख गीतेतही केला आहे. म्हणूनच राजकारण, समाजकारण, ऑफिस, कुटुंब या सर्व ठिकाणी समोरच्या प्रत्येक व्यक्तीबद्दल शुभचिंतन केलेच पाहिजे. प्रार्थनेमध्ये सर्वांसाठी शुभ मागितल्यामुळे प्रार्थना म्हटल्यावर आपण सर्वांशी जोडले जातो. शुभचिंतनाचे महत्व सांगितल्यावर श्री.प्रल्हाद पै visualization technique चाही उल्लेख करतात. हे technique नेमके काय आहे हे जाणून घ्या या वेबिनार मधून…..

WordPress Lightbox Plugin