वेबिनार ७

संवादकौशल्ये आपण प्रत्येक स्तरावर विकसित करावी लागतात. आपण कुटुंबात, नवरा – बायकोत, समाजात संवाद साधत असताना संवादासोबतच ऐकण्यावर (Listening) देखील भर दिला पाहिजे तेव्हाच संवाद परिपूर्ण होतो.

संवादकौशल्याच्या विविध पैलूंपैकी आणखी एक पैलू म्हणजे श्रेय (credit) वाटणे. कंपनी मध्ये अनेकजण बॉस सोबत गोड गोड बोलून श्रेय स्वत: घेण्याचा प्रयत्न करतात. हे पूर्णत: चुकीचे आहे. किंबहुना आपण कोणतेही काम केल्यास त्याचे श्रेय पूर्णत: स्वत: न घेता इतरांनाही श्रेयात सहभागी करून घेतले पाहिजे. परंतु यामध्ये बावळटपणा अपेक्षित नाही. ऑफिस मध्ये आपण केलेले काम हे बॉसला दिसले पाहिजे. मात्र संवादाच्या माध्यमातून आपण जेव्हा इतरांनाही कामाचे श्रेय देतो तेव्हा सर्वजण खूश होतात. हा leadership चा एक महत्वाचा गुण आहे.

संवादाचा आणखी एक भाग म्हणजे Gossiping. अनेकदा या निरर्थक गप्पा अर्धवट माहितीच्या आधारे केल्या जातात. Whatsapp च्या माध्यमातून अनेकदा अफवा पसरवल्या जातात. या सर्व गोष्टीतून चुकीची माहिती पसरवून काहीच साध्य होत नाही. म्हणून negative gossiping करण्यापेक्षा positive gossiping करणे योग्य ठरेल.

अशाप्रकारे समाजातील विविध व्यक्तींशी (external communication) व अंतर्मनाशी (internal communication) संवाद कसा साधायचा याचे मार्गदर्शन श्री. प्रल्हाद पै प्रस्तुत वेबिनारच्या माध्यमातून करतात.

WordPress Lightbox Plugin