वेबिनार ६

संवाद यशस्वी होण्यासाठी काही गोष्टींची नोंद घ्यावी लागते, त्याचा उलगडा श्री.प्रल्हाद पै प्रस्तुत वेबिनारमध्ये करतात.

कोणत्याही संवादातून माणसे जोडली गेली पाहिजेत; कारण विश्वातील प्रत्येकजण आपल्यासाठी उपयुक्त असतो. म्हणूनच संवादकौशल्य Relationship Management ला फार महत्व आहे. अनेकदा संवादातून लोकांना कमी लेखले जाते, criticize केले जाते. नेहमी होणार्‍या गप्पांमध्ये एकमेकांची निंदा केली जाते. मात्र निंदा करून समस्या आणखी वाढण्याची दाट शक्यता असते. राजकारणातही अनेक जण एकमेकांची निंदा करतात मात्र सरतेशेवटी त्यांना युती करावीच लागते. म्हणून spirit of approval is important than spirit of criticism असे श्री.प्रल्हाद पै म्हणतात. अन्यथा criticism ने काहीही साध्य होत नाही. कंपनीमध्ये कामगारांची टीका, नाराजी यांवर नेमके उपाय काय करायचा याचे ही मार्गदर्शन श्री. प्रल्हाद पै या वेबिनरच्या माध्यमातून देतात.

संवादात अनेकदा भांडणं (conflict) होतात अशावेळी वादविवाद टाळून तडजोड करणे अधिक संयुक्तिक ठरते. Avoid argument; create agreement व त्यासाठी आवश्यक असते adjustment. म्हणूनच वादविवाद झाल्यास तडजोड वृत्तीने आपण अनेक समस्या मिटवू शकतो व नाती जपू शकतो. अशाप्रकारे संवादाच्या माध्यमातून सतत प्रेमाचे, आनंदाचे, उल्हासाचे, कौतुकाचे प्रक्षेपण झाले पाहिजे. इतरांनी मारलेले tonts, केलेल्या टीका यांना आपण कसे सामोरे जावे याचेही साजेसे उदाहरण श्री.प्रल्हाद पै या वेबिनार मधून देतात. संवादातील या सर्व गोष्टी सांभाळत संवाद यशस्वी कसं करावा हे जाणून घ्या वेबिनारमधून…….

WordPress Lightbox Plugin