वेबिनार ५

आपल्याला जर सुख, शांती, समाधान हवे असेल तर आपल्याकडे उत्तम संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे. संभाषण कौशल्याचा एक पैलू म्हणजे “Art of Listening”. म्हणून नेहमी बोलण्यापेक्षा ऐकण्यामध्ये जास्त ऊर्जा खर्च करावी व लगेचच प्रतिक्रिया न देता विचार करून समोरच्या व्यक्तिला प्रतिसाद द्यावा. संवाद हा सुखसंवाद होण्यासाठी देहबोली, हावभावाच्या माध्यमातून नेमके काय केले पाहिजे, याचे मार्गदर्शन श्री.प्रल्हाद पै वेबिनारमध्ये करतात.

प्रत्येक संवादाला हेतू असावा. साध्या गप्पांना देखील मज्जा आली पाहिजे; हा हेतू असतो. म्हणून संवादातून आनंद निर्माण होईल याची काळजी आपण घेतली पाहिजे. शब्द नेहमी चांगले असावेत. वाईट शब्दांमुळे माणसे दुरावतात कारण शब्दांना धार असते. या शब्दांना आपुलकीचा, सन्मानाचा आधार असला पाहिजे; कारण कोण, कुठे, केव्हा, कसा, कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही म्हणूनच आपण नेहमी सर्वांशी नीट वागले पाहिजे.

कामाच्या ठिकाणी leadership कशी असावी याची गुरुकिल्लीही श्री.प्रल्हाद पै या वेबिनारच्या माध्यमातून देतात.
अनेकदा संवाद करताना आग्रह असतो व तिथूनच वादाला सुरवात होते. पण स्वत:ला हवे असणारे कौतुक, मान-सन्मान इतरांनाही हवा असतो, हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे. अशाप्रकारे आपण स्वाभिमान जपत व आपला अहंकार चेपत, दुसर्‍यांचा अहंकार जपावा. संवादात नकारात्मक शब्दांऐवजी प्रेमाचे, आपुलकीचे, मायेचे सकारात्मक शब्द वापरले व मन मोठे केले की जीवनात अचंबित करणारे सुखद अनुभव तुम्हाला येतील. यासाठी नेमके काय व कसे करायचे ते जाणून घेऊया या वेबिनारच्या माध्यमातून………

WordPress Lightbox Plugin