वेबिनार २९

हा वेबिनार दिवाळी विशेष आहे. दिवाळी हा आनंदाचा दिवस या दिवसात आपण सर्वांना शुभेच्छा देतो, फराळ देतो, आनंद साजरा करतो. हा आनंद संपूर्ण वर्षभर साजरा करता येईल का? सद्गुरू श्री.वामनराव पै म्हणतात, प्रत्येक क्षण आनंदाचा झाला पाहिजे व याला उपाय एकच “आनंद वाटा आनंद लुटा”. म्हणूनच आपण प्रत्येक क्षणाला सावध राहुया. आपण दुसर्‍याला आनंद देतो की नाही याचे भान प्रत्येक क्षणाला ठेवूया.

दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव. सद्गुरू श्री.वामनराव पै म्हणतात, ‘अंधाराकडून प्रकाशाकडे जाणे म्हणजे अंधश्रद्धा, दुख, अहंकार, अज्ञान गोष्टींकडून ज्ञानाकडे जाणे होय.’ ज्ञानामुळे अंधश्रद्धेचे रूपांतर श्रद्धेत होते, दु:खाचे रूपांतर सुखात तर अहंकाराचे रूपांतर अलंकार होते. अहंकाराचे रूपांतर अलंकारात करायचे तर सर्वात सुंदर उपाय म्हणजे कृतज्ञता.

जीवनविद्या सांगते, आपले आई वडील हे आपले देव आहेत. त्यांचे अनंत उपकार, ऋण आपल्यावर असतात; म्हणूनच आपण त्यांच्याबद्दल सदैव कृतज्ञ असले पाहिजे. ही कृतज्ञता; सहवास, स्पर्श, संवाद या माध्यमातूनही आई वडिलांप्रती व्यक्त झाली पाहिजे, असे श्री.प्रल्हाद पै सांगतात. आईवडिलांनी मुलांना व मुलांनी आईवडिलांना quality time देणे आवश्यक आहे. हा quality time देणे म्हणजे संवाद साधणे, वेळ देणे, त्यांच्या सोबत बाहेर फिरायला जाणे. मुलांनी आईवडिलांना आवडनिवड जोपासायला मदत केली पाहिजे. यामुळे घरातील वातावरण आनंदी राहते. घरासोबतच बाहेरही आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी काय करायला हवे, हे सांगताना श्री.प्रल्हाद पै म्हणतात की आपला सहवास इतरांना हवाहवासा वाटला पाहिजे. इतके आनंदाचे प्रक्षेपण आपण सतत केले पाहिजे. हे प्रक्षेपण नेमके कसे करावे, हे जाणून घ्या प्रस्तुत वेबिनार मधून.

WordPress Lightbox Plugin