वेबिनार २८

मागील वेबिनार मध्ये ‘जीवनमूल्ये’ या विषयाबद्दल मार्गदर्शन झाले. ‘जीवनमूल्ये’ (values of life) चा संबंध relationship management शी येतो. नातेसंबंध नीट सांभाळले तर उत्कर्ष उन्नती आपोआप होते.

सध्याच्या युगात ‘मी –माझे, my life’ ही संस्कृती निर्माण झाली आहे. आपण सर्व एकमेकांवर इतके आवलंबून आहोत की its my life ऐवजी its our life म्हणणे संयुक्तिक ठरेल. याचे प्रमुख कारण म्हणजे आपण सर्वजण चैतन्यशक्तीने एकमेकांशी जोडले गेलो आहोत. या संदर्भात श्री.प्रल्हाद पै वीजेचे उदाहरण देतात.

आपल्याला परमेश्वराने स्मरणाचे बटण बहाल केले आहे. स्मरणाचे बटण दाबले की दोन माणसे विचार, भावना यांच्या माध्यमातून एकमेकांशी जोडली जातात. म्हणूनच आपण जे विचार करतो ते त्या व्यक्तिपर्यंत आपोआप पोहोचतात. अनेक लोक gossiping ची मज्जा घेतात. मात्र gossiping मध्ये आपण ज्या व्यक्तींची निंदा करतो ती त्या व्यक्तिपर्यंत पोहोचते. म्हणून gossiping टाळले पाहिजे.

आपण सर्वांवर अवलंबून असतो त्यामुळे सर्वांबद्दल सतत कृतज्ञ राहिले पाहिजे. कृतज्ञता हा मोठा शोध आहे, भाव आहे, विचार आहे, साधना आहे. जे आहे, ज्याच्यामुळे आहे, जे पाहिजे आहे त्या सर्व गोष्टींसाठी कृतज्ञ राहिले पाहिजे. कृतज्ञतेमध्ये इतकी शक्ती आहे की आपल्या इच्छेप्रमाणे सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य कृतज्ञतेत आहे. म्हणूनच आपल्याला कळत नकळत मदत करणार्‍या सर्व लोकांची, आई वडिलांची, कंपनीची सतत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कृतज्ञता हा भाव सतत बाळगल्याने तो अंतर्मनात जाऊन आपण आपला प्रत्येक क्षण आनंदी करू शकतो.

WordPress Lightbox Plugin