वेबिनार २७

‘समाधान’ या जीवनमूल्याचे स्पष्टीकरण श्री.प्रल्हाद पै प्रस्तुत वेबिनारमध्ये देतात. आपल्या सर्वांकडेच ‘लोभ’ ही गोष्ट असते. लोभ म्हणजे इच्छा पूर्ण झाली तरी ती अजून मिळावी असे वाटणे. सध्या माणसे पैशासाठी इतकी लोभी आहेत की सतत need more and more यात गुंतलेले असतात. त्यासोबतच असते ते comparison. सतत स्वत:ची तुलना इतरांशी करून आपण अधिक निराश होतो. मग आपण इच्छा, महत्वाकांक्षा ठेवू नये का? अर्थात होय. आपण इच्छा, महत्वाकांक्षा ठेवल्याच पाहिजे; परंतु ‘आहे त्यात समाधानी व जे नाही त्यासाठी प्रयत्न’ ही वृत्ती जोपासली पाहिजे.

प्रयत्न करताना आपण एका बाजूने समाधानी असणे आवश्यक आहे. अनेक लोक आयुष्यभर पैशाच्या पाठीमागे पिसाटासारखी धावतात. व आयुष्याच्या शेवटी आपण जीवनाचा आनंदच घेतला नाही हे त्यांच्या लक्षात येतं. म्हणूनच जे आहे त्यात समाधानी राहून इतर आशा-आकांक्षा जोपासत राहावे.

अनेकजण परदेशी पैसा कमविण्यासाठी जातात व कायमचे तिथेच स्थायिक झाल्यामुळे आई वडिलांकडे दुर्लक्ष करतात. नोकरीसाठी पती-पत्नी एकमेकांपासून दूर राहतात, कित्येकजण overtime च्या नादात शरीराकडे व कुटुंबाकडे दुर्लक्ष करतात, हे सर्व चुकीचे आहे. सद्गुरू श्री.वामनराव पै म्हणतात; “समाधान हे धन आहे व हे धन आपण जपले पाहिजे”. कुटुंब, स्वत:चे जीवन, आरोग्य या सर्व मौल्यवान गोष्टींकडे पुरेसे लक्ष द्या. पैसा व करिअर यांची जास्त नशा केली की ती फार त्रासदायक ठरते.

समाधानाचे महत्व विविध उदाहरणांच्या माध्यमातून पटवून दिल्यावर श्री.प्रल्हाद पै कृतज्ञतेचे महत्व अधोरेखित करतात. ही कृतज्ञता म्हणजे नेमकं काय, कृतज्ञता का व कोणाबद्दल व्यक्त करावी हे जाणून घ्या या वेबिनारमधून….

WordPress Lightbox Plugin