वेबिनार २५

दैनंदिन जीवनात निर्माण होणार्‍या विविध समस्यांचे मूळ म्हणजे गैरसमज हे होय व गैरसमजाचे मूळ अहंकारात आहे. म्हणून स्वत:चा अहंकार चेपत इतरांचा अहंकार जपणे म्हणजे तडजोड करणे हे होय.

तडजोड म्हणजे बावळटपणा, माघार घेणे नव्हे. आपले हित सांभाळणारे हे सर्वात मोठे शहाणपण आहे. अनेक लोकांची ‘I don’t care’ अशी स्वार्थी वृत्ती असते. परंतु दुसर्‍याची काळजी घेत, त्यांचा स्वार्थ जपत, आपला स्वार्थ जपणे यात खरे शहाणपण आहे.

नवरा-बायको मध्ये तडजोड नसल्यामुळे घटस्फोट घेण्याचे प्रमाण आजकाल वाढत जात आहे. अनेकजण घरी एकमेकांशी अबोला धरतात. मुली स्वत: करिअर करत असल्यामुळे जरा पटले नाही तर लगेचच संसारातून दूर होतात. अशाप्रकारे नवरा-बायको मधील विकोपाला गेलेले संबंध सुधारण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, याचे मार्गदर्शन आदरणीय श्री.प्रल्हाद पै या वेबिनार मधून करतात.

विश्वप्रार्थना हे वरील सर्व समस्यांवर उत्तम उपाय आहे. या प्रार्थनेने मन जोडली जातात, संबंध सुधारतात व जीवनात आनंदीआनंद निर्माण होतो. सद्गुरूंनी आपल्या तत्वज्ञानातून सर्वांना शहाणपण दिले आहे. त्यामुळे समस्या कशाप्रकारे सोडविता येतात, याची दोन महत्वाची उदाहरणे श्री. प्रल्हाद पै प्रस्तुत वेबिनारच्या अखेरीस देतात. सर्वांचे भलं कर, असे म्हणत तडजोड अधिक सोपी कशी करावी हे जाणून घेऊया या वेबिनार मधून….

WordPress Lightbox Plugin