वेबिनार २४

शहाणपणाच्या सहा मूल्यांपैकी सामंजस्य या विषयावर श्री.प्रल्हाद पै प्रस्तुत वेबिनार मध्ये अधिक मार्गदर्शन करतात. समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान, कृतज्ञता ही सहा जीवनमूल्ये एकमेकांशी संलग्न आहेत.

आई-वडिलांशी नीट न वागणे, ऑफिस मध्ये येणार्‍या विविध समस्या, दु:ख, अपयश, नवरा-बायको मध्ये होणारी भांडणं या विविध समस्यांवर ‘सामंजस्य’ हा एकमेव उपाय आहे. सामंजस्य म्हणजे इतरांना समजून घेणे. जीवनातील विविध स्तरांवर सामंजस्याने कसे वागावे, हे आपणास प्रस्तुत वेबिनार मध्ये जाणून घेता येईल.

कॉर्पोरेट क्षेत्र, व्यवसायात अनेक करार (deals) होतात. हे करार करताना आपण सावध असणे आवश्यक आहे. अशावेळी कोणताही पूर्वग्रह न ठेवता समोरील व्यक्तीचे बोलणे समजून घेणे हितकारक ठरते. हा संवाद साधताना कोणतीही गोष्ट ग्राह्य न धरता सर्व स्पष्ट बोलणे आवश्यक आहे. सावध राहणे म्हणजे अविश्वास दाखवणे नव्हे; परंतु मोठ्या व्यवहारांत अथवा करारांमध्ये प्रत्येक गोष्टीची लेखी नोंद (documentation) ठेवणे महत्वाचे आहे.

अनेकदा agreement होताना वादविवाद होतात. अशावेळी सामंजस्याने आपण संवाद साधून एकमेकांच्या अपेक्षा समजून घ्याव्यात. सामंजस्याचे सावधता, तडजोड व लवचिकता हे तीन महत्वाचे पैलू आहेत. अनेकांना स्वत:चेच म्हणणे खरे करण्याची सवय असते. ‘मोडेन पण वाकणार नाही’ या मराठी बाण्याचे ते तंतोतंत आचरण करीत असतात. पण ‘मोडतोड’ या शब्दात ‘मोडण’ आहे; तर ‘तडजोड’ या शब्दात ‘जोडणे’ आहे. म्हणूनच ‘वाकेन पण मोडणार नाही’ या बाण्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. तडजोड म्हणजे बावळटपणा नव्हे. त्यात win all हे वृत्ती अपेक्षित आहे. यासाठी मनात सर्वांचे भलकर हे चिंतन सतत करा. आपण जेव्हा समोरच्या व्यक्तीबद्दल चांगले चिंतन करतो तेव्हा त्या व्यक्तीत बदल होऊन ती आपल्याला मदत करते. हे स्पष्ट करताना श्री.प्रल्हाद पै कौटुंबिक उदाहरण देतात.

आपण दुसर्‍यांबद्दल चांगले चिंतन केल्यावर आपल्या आयुष्यात नेमका काय परिणाम होतो ते जाणून घेण्यासाठी ऐका हा वेबिनार…

WordPress Lightbox Plugin