वेबिनार २३

‘नम्र झाला भूता, तेणे जोडिले सर्वांना’ या सुंदर स्वरचित वाक्याने श्री.प्रल्हाद पै वेबिनारला प्रारंभ करतात.

प्रत्येक माणसामध्ये सद्गुण व दुर्गुण असतात. नवीन लग्न झाल्यावर पहिले दोन वर्ष आनंदात जातात; परंतु साथीदाराच्या स्वभावातील दुर्गुणांमुळे हे प्रेम नंतर आटत जाते. म्हणून संसार सुखाचा करण्यासाठी साथीदारातील दुर्गुणांचा स्वीकार करत तडजोड करणे आवश्यक आहे. यालाच सामंजस्याने वागणे असे म्हणतात. सामंजस्य हे सहा जीवनमूल्यांपैकी तिसरे मूल्य. संवादामध्ये वादविवाद निर्माण झाल्यास प्रथम दुसर्‍यांची बाजू समजावून घेणे महत्वाचे आहे.

अनेक लोकांना इतरांना वाईट बोलणे, त्यांच्याबद्दल वारेमाप चर्चा करणे, यातच आनंद वाटतो परंतु अज्ञानाच्या अधिष्ठानावर इतरांबद्दल चुकीचे बोलणे, अहितकारक आहे. म्हणूनच कंपनीत चालणार्‍या gossiping मध्ये सहभागी होणे टाळले पाहिजे. सामंजस्याचे स्पष्टीकरण देताना आईने स्वत:च्या मुलांसोबत इतर मुलांनाही प्रेम दिले पाहिजे, असे श्री. प्रल्हाद पै सांगतात.

अनेकदा घरामध्ये क्षुल्लक कारणांवरून मोठमोठी भांडणे होतात व घरात अशांतता, अस्थैर्य निर्माण होते. हे टाळण्यासाठी कोणत्याही गोष्टीला दु:खाचा तडा जाऊ न देता त्याला सुखाची जोड देण्यासाठी केलेल्या तडजोडीतच खर्‍या अर्थाने शहाणपण आहे. सामंजस्याचे विविध पैलू सांगत ते ऑफिस, घर व समाज या तिन्ही स्तरांवर कसे आचरणात आणावेत हे देखील श्री.प्रल्हाद पै वेबिनारमध्ये सांगतात.ते अधिक सखोल जाणून घेण्यासाठी ऐका हा वेबिनार…

WordPress Lightbox Plugin