वेबिनार २२

Relationship Management मध्ये जीवनमूल्यांना फार महत्व आहे. आपल्याला यश टिकवून ठेवायचे असेल तर जीवनमूल्ये आचरणात आणणे महत्वाचे आहे. सद्गुरूंनी सांगितलेल्या ६ जीवनमूल्यांपैकी समता व सभ्यता या विषयांवर श्री.प्रल्हाद पै मार्गदर्शन करीत आहे.
समता दर्शनात असावी. आपल्या सहवासात येणारा प्रत्येकजण आपल्याला प्रथम आवडतो; पण हळूहळू त्यातले दुर्गुण कळू लागल्यावर आपल्या मनात त्यांच्याबद्दल द्वेषाची भावना निर्माण होऊ शकते. म्हणून प्रत्येक माणसाकडे असणारे सद्गुण व दुर्गुण यांचा आपल्याला स्वीकार करता आला पाहिजे. यालाही ‘समता’ असे संबोधतात.

सभ्यतेचे स्पष्टीकरण देताना श्री.प्रल्हाद पै स्त्रीचे महत्व अधोरेखित करतात. आपण स्त्रीच्या कष्टाची, त्यागाची, भावनेची कदर केली पाहिजे. आजची स्त्री ही घर, करिअर सांभाळून सर्व काही करते. स्वत:च्या आईवडिलांचे घर सोडून ती नवीन कुटुंब सांभाळते, नवीन घरात तडजोड (adjustment) करते. अशा स्त्रीला सन्मानाने वागवणे अपेक्षित आहे. परंतु जनमानसात विरूद्ध परिस्थिती दिसून येते. सासू सासर्‍यांकडून होणारा छळ, स्त्रीचा अपमान या गोष्टी पाहायला मिळतात. अशावेळी सर्वांनी प्रेमाने स्त्रीला आपल्यात सामावून घेणे हितकारक आहे.

आजकाल घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. मुलींनीही सासू सासर्‍यांचे मन जिंकले पाहिजे. नवीन घर आपले समजून त्यात एकजीव झाली पाहिजे. घटस्फोटाच्या विविध करणांचे स्पष्टीकरण देताना श्री.प्रल्हाद पै सर्वांना घरी पुरेसा वेळ देण्याचा सल्ला देतात. आजकाल कंपनीत अधिक वेळ काम केल्याने इतरांचा सहवास जास्त मिळतो व सहवासाने प्रथम कोणताही माणूस आवडतोच; पण नंतर त्याचे दुर्गुण समोर येतात. इतरांच्या नादात घराकडे, स्वत:च्या संसाराकडे दुर्लक्ष होते व समस्या वाढत जातात. त्यामुळे सर्व बाबतीत सावध राहून जीवन कसे जगावे, याचे मार्गदर्शन ते करतात.

‘प्रेम म्हणजे एकमेकांनी एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न’ हा सुंदर विचार सांगून त्या संदर्भातील एक अनुभव श्री. प्रल्हाद पै प्रस्तुत वेबिनार मध्ये समाविष्ट करतात.

जीवनातील हा सर्वात महत्वाचा विषय जाणून घ्या या वेबिनारमधून….

WordPress Lightbox Plugin