वेबिनार २०

प्रस्तुत वेबिनार मध्ये काही तरुणांनी श्री.प्रल्हाद पै यांना विविध प्रश्न विचारले॰ हे प्रश्न कॉर्पोरेट तसेच वैयक्तिक जीवनाशी निगडीत होते. यावेळी कंपनीत सुरू असलेल्या politics ला शुभचिंतनाने कसे सामोरे जायचे, अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करून सुयोग्य साथीदार कसा मिळवावा याचे सुंदर मार्गदर्शन श्री.प्रल्हाद पै वेबिनार मधून करतात.

जीवनाच्या कोणत्याही टप्प्यावर relationship ला फार महत्व आहे. यासाठी शहाणपणाची जोड relationship ला देणे आवश्यक आहे. हे शहाणपण (wisdom) अध्यामातून (spirituality) व निसर्गनियमातून येते.

सद्गुरू श्री.वामनराव पै यांनी शहाणपणाची ६ मूल्ये सांगितली; समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान व कृतज्ञता. आपल्याला उत्कर्ष साधायचा असेल तर ही मानवी संस्कृती ची जीवन मूल्ये आपण अंगीकारली पाहिजेत. या सहा मूल्यांपैकी पहिले मूल्य म्हणजे समता.

समता या शब्दाचा सरळ सोपा अर्थ सर्वांना समान वागणूक देणे. सद्गुरू श्री.वामनराव पै यांच्या मते, ‘समता’ या शब्दाला विविध कंगोरे आहेत. ते म्हणतात, समता ही दर्शनात आहे. सर्वत्र व्यवस्थारूपी परमेश्वर आहे. म्हणूनच आपल्याला प्रत्येकाकडे ‘माणूस’ म्हणून पाहता आले पाहिजे व प्रत्येकाला त्याचा योग्यतेनुसार मान-सन्मान दिला पाहिजे. आजही अनेक स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक समाजात मिळत आहे, हे पूर्णत: चुकीचे आहे. स्त्रीला कमी लेखणे हे समतेचे लक्षण नाही. स्त्री पुरुष दोघांनाही समान महत्व असणे म्हणजे समता. अशा या समतेचे कंगोरे जाणून घ्या या वेबिनार मधून.

WordPress Lightbox Plugin