वेबिनार १९

आजकाल कॉर्पोरेट क्षेत्रात spirituality in workplace या विषयावर अनेक सेमिनार्स आयोजित केले जातात. खरतर spirituality म्हणजे १० मिनिटे डोळे बंद करून ध्यान करणे नव्हे. Spirituality मध्ये आधिभौतिक प्रगती (material progress) व अध्यातम (spirituality) यांचा योग्य समतोल असला पाहिजे. जीवनात हा समतोल नेमका कसं साधायचा, याचे सुरेख मार्गदर्शन सद्गुरू श्री.वामनराव पै यांनी निर्माण केलेले जीवनविद्येचे तत्वज्ञान करते. जीवनविद्या मिशनने L&T, गोदरेज, TCS, गोकुळ अशा नामवंत कंपन्यांमध्ये विविध कौर्सेस आयोजित केले आहेत व करत आहे. यामागे लोकांची मानसिकता बदलणे हेच जीवनविद्या मिशनचे उद्दीष्ट आहे.

अनेक लोकांना पैसा हेच सर्वस्व वाटते. सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य पैशांत आहे, अशी त्यांची गैरसमजूत असते. अशी माणसे कुटुंब, नाती यांकडे दुर्लक्ष करून मिळेल त्या मार्गाने पैसा कमविण्यासाठी आकाशपाताळ एक करतात. कामावरील stress घरी व्यक्त करून ते कुटुंबात व इतर ठिकाणी समस्या ओढवून घेतात.

Money culture सध्या फोफावत असून relationship culture नष्ट होत आहे. कंपनीत काम करताना प्रत्येकजण आपला उत्कर्ष, पैसा यांच्या मागे असतो, परंतु कंपनीत एकमेकांना मदत करणे, माणसे सांभाळणे या गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक कंपन्या रातोरात अनेक लोकांना कंपनी मधून काढून टाकतात. यासाठी relationship management चा बारकाईने विचार करणे आवश्यक आहे. कंपनीने माणसांना व माणसांनी कंपनीला सांभाळणे आवश्यक आहे.

आपण स्वत: बदललो की आजूबाजूचे जग बदलायला आपोआप सुरवात होते. म्हणून बॉस, customer, इतर सहकारी यांच्याशी प्रेमाने, आपुलकीने वागत आपण हे वातावरण कसे बादलायचे, team building कसे करावे; याचे सुंदर मार्गदर्शन श्री.प्रल्हाद पै वेबिनार मध्ये करतात. यासाठी ते कौतुकाचे महत्व अधोरेखित करतात. कौतुक हे प्रत्येकाला आवडत असते किंबहुना दुसर्‍याच्या अस्तित्वाचे भान घेणे म्हणजे कौतुक. इतरांनी आपल्यासाठी उच्चारलेले कौतुकाचे दोन शब्द आपल्याला एक नवी प्रेरणा, ऊर्जा देऊन जातात. हे कौतुक कौटुंबिक व कॉर्पोरेट आयुष्यात नेमकी काय किमया घडवते ते जाणून घेण्यासाठी ऐका हा वेबिनार.

WordPress Lightbox Plugin