वेबिनार १८

Leadership या विषयावर मार्गदर्शन करताना श्री.प्रल्हाद पै म्हणतात, ”Leader should suppose to convert vision into reality”. अशा leader ला visionary leader असे म्हणतात. या visionary leader साठी नेमके काय करावे याचे रहस्य प्रस्तुत वेबिनार मध्ये आपणास जाणून घेता येईल. व्यापक leader हा फक्त पदाने होत नाही. ज्याच्याकडे दूरदृष्टी असते, vision असते, तेच लोक leader होऊ शकतात.

सद्गुरू श्री.वामनराव पै यांचे ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे’, हे vision आहे. व ‘घर तेथे जीवन विद्या’ हे मिशन आहे. Leadership चे विविध प्रकार असून सर्वांच्या हिताचा विचार करणारा leader सर्वांना हवाहवासा वाटतो. या वेळी श्री.प्रल्हाद पै, leader ने पुढील दोन गोष्टींचा प्रामुख्याने विचार करावा, असे सुचवतात;
1) Concern for people.
2) Concern for performance.

कॉर्पोरेट ऑफिस, राजकारण, संस्था या सारख्या विविध ठिकाणी कार्यरत असणार्‍या leader ने या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणे आवश्यक आहे. समोरील व्यक्तीच्या समस्या, दु:ख, भावना समजून घेऊन योग्य वेळी मदत करणे व व्यक्तीच्या कामासंदर्भातील गुणवत्ता या दोन गोष्टी संस्थेच्या विकासासाठी कारणीभूत ठरतात. अनेकदा Leader म्हटलं की, ‘हम करें सो कायदा’ अशा वृत्तीची माणसे नजरेसमोर येतात. हा प्रकार चुकीचा असून लीडरने सर्वांची मते, विचार ऐकून मग आपला निर्णय देणे हितकारक ठरते. कंपनी मध्ये विविध गोष्टींवर arguments, वादविवाद होतात अशावेळी लगेच ‘हो’ म्हणून नंतर योग्य तो निर्णय घेण्यात शहाणपण ठरते. लीडरने listening च्या बाबतीत सावध असले पाहिजे. Listening म्हणजे निर्भेळ ऐकणे, कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता, निरपेक्ष भावनेने सर्वांची मते, विचार ऐकून घेण्याची कला लीडरने अंगीकारणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे concern for performance व concern for people चा समतोल ठेवत लीडर कार्यरत राहावे. लीडरचे हे पैलू घरापासून ते ऑफिस व राजकारणातही लागू आहेत. घरी मुलगा अभ्यास करतो की नाही हे concern for performance ;तर तो माणूस म्हणून चांगले घडतो की नाही हे concern for people एएएचई. अशाप्रकारे हे ज्ञान सर्वत्र उपयुक्त आहे.

कौतुक करण्याचा गुण देखील लीडरकडे असणे आवश्यक आहे, असे श्री.प्रल्हाद पै वेबिनारमध्ये सांगतात. या सोबतच मिटींग कशी सांभाळावी, सर्वांचा विचार करत विविध समस्यांना तरुणांनी कसे सामोरे जावे, हे जाणण्यासाठी ऐकूया ……हा वेबिनार…..

WordPress Lightbox Plugin