वेबिनार १७

रिलेशनशिप म्हणजे माणसे जोडणे, हा फार महत्वाचा विषय आहे. प्रस्तुत वेबिनार मध्ये ‘लीडरशिप’ या विषयाबद्दल श्री.प्रल्हाद पै यांनी मार्गदर्शन केले आहे.

लीडरशिप म्हणजे रिलेशनशिप अर्थात माणसे जोडणे. लीडर असणे आणि पोस्ट असणे यात फार फरक आहे. पोस्ट मुळे लीडर होऊ शकत नाही पण लीडरशिप मुळे पोस्ट मिळू शकते. लीडरला लोकांची मान्यता असली पाहिजे. आता ही मान्यता केव्हा मिळेल? जेव्हा लोकांना त्या व्यक्तीच्या ज्ञानाबद्दल, वागण्याबद्दल आदर वाटतो तेव्हा लीडर बद्दल भिती नसावी, आदरत्मक भिती चालेल.
माणसे जोडण्याबाबतीत दोन गोष्टी महत्वाच्या आहेत त्या पुढीलप्रमाणे –
1) इतर व्यक्ती आपल्यासोबत comfortable असली पाहिजे.
2) इतरांना आपला सहवास हवाहवासा वाटला पाहिजे.

लीडरनेही इतरांचा अहंकार सांभाळत सर्वांना सांभाळून घेतले पाहिजे, सर्वांना आपला सहवास हवाहवासा वाटेल, अशी प्रतिमा निर्माण केली पाहिजे. इतरांना सुख, आनंद, हास्य देणारी व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते. साधे स्मितहास्य देऊनही आपण लोकांना आनंद देऊ शकतो.

अनेकदा ऑफिस मध्ये चूक झाल्यावर ही चूक का झाली यापेक्षा ती कोणी केली यावर जास्त भर दिला जातो. खर्‍या लीडरने या सर्वांतून योग्य मार्ग काढत, सर्वांना सांभाळत हे काम पूर्ण केले पाहिजे. या सर्वात मनापासून केलेल्या कौतुकालाही फार महत्व आहे. लीडरने केलेल्या कामाचे श्रेय (credit) प्रत्येकाला दिले पाहिजे. ऑफिस, घर, मुलं, पत्नी सर्वांनाच कौतुक हवेहवेसे असते. किंबहुना या सर्वांचे भरभरून मनापासून कौतुक केले की त्यांनाही स्फूर्ती मिळते व आपल्याकडेही तेच बुमरॅग होऊन येते. असे ही कौतुक आणि mature leadership चे महत्व जाणून घ्या या वेबिनार मधून…

WordPress Lightbox Plugin