वेबिनार १४

आजकाल ‘Depression’ ही फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. हे depression म्हणजे नेमके काय, ते काय येते व अशा परिस्थितीतून आपण बाहेर कसं यायचे, याचे मार्गदर्शन प्रस्तुत वेबिनार मध्ये श्री.प्रल्हाद पै यांनी केले आहे.

आपण केलेले काही विचार अंतर्मनात मुरतात त्याचे कारण बहिर्मन व अंतर्मनाचे भावनिक ऐक्य, सतत स्वयंसूचना (repetition), श्रद्धा, विश्वास या गोष्टींमुळे भावनिक ऐक्य साधले जाते. मुले जेव्हा अभ्यास करत नाही तेव्हा पालक पुन्हापुन्हा त्यांना अभ्यास कर, असे सांगतात. त्याचप्रमाणे आपले विचार, इच्छा पुन्हा पुन्हा सांगून अंतर्मनाला ते पटवून देता आले पाहिजे. परंतु नुसता विचार करून उपयोग नाही. त्याला योग्य दिशेने प्रयत्नांची जोड मिळाली पाहिजे. इच्छा फलद्रूप होण्यामागे असलेली आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पुण्य. आपण सत्कर्म करून ही पुण्याई सतत जमा करावी, याचेही स्पष्टीकरण श्री.प्रल्हाद पै या वेबिनार मध्ये देतात.

जीवनात यश अपयशाचा खेळ सुरूच राहतो. त्यामुळे अपयश आल्यावरही आपली अंतर्मनावरील श्रद्धा कमी होता कामा नये. या नंतर ते case study बद्दल तरूणांशी संवाद साधतात. सर्वात शेवटी लोकांबद्दलची कृतज्ञता व प्रेम देखील महत्वाचे आहे. असा उल्लेख ते वेबिनार मध्ये करतात.

WordPress Lightbox Plugin