वेबिनार १३

आज वेबिनार सिरीज सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले. या प्रसंगी अनेक प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जीवनविद्या मिशन पर्यंत पोहोचल्या.
श्री.प्रल्हाद पै यांनी सर्व प्रेक्षकांची कृतज्ञता व्यक्त करत काही प्रतिक्रियांचा वेबिनार मध्ये उल्लेख केला. त्यामध्ये एका स्त्रीने आई म्हणून मी निश्चिंत झाले, इतके सुंदर मार्गदर्शन या वेबिनार मधून मिळते अशी भावस्पर्शी प्रतिक्रिया व्यक्त केली.

आपले सर्व संकल्प पूर्ण करण्यासाठी अंतर्मनाच्या शक्तीचा वापर करायचा, याबद्दल श्री.प्रल्हाद पै वेबिनार च्या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत. आपले ध्येय साकार होण्यासाठी आपण पुढील ३ गोष्टी करणे महत्वाचे आहे.

१) आपला संकल्प पूर्ण होणारच हे सतत मनाला सांगणे. (Repetitive Affirmation)
२) सतत positive राहावे. नकारात्मक विचार आल्यास लगेच सावध होऊन विश्वप्रार्थना म्हणणे.
३) निसर्गनियमांशी सुसंगत वागणे.
या सर्वात महत्वाचे अंतर्मनावर दृढ श्रद्धा, निष्ठा ठेवणे.

अंतर्मनावर अफाट विश्वास, श्रद्धा ठेवल्यास तसा प्रतिसाद अंतर्मन आपल्याला देते व अंतर्मनावरील श्रद्धा अधिक वाढत जातो. अंतर्मनाचे विविध पैलू श्री.प्रल्हाद पै वेबिनार मधून विविध उदाहरणांच्या माध्यमातून उलगडून दाखवतात. अशा या अंतर्मनरूपी कल्पतरुला कसे प्रसन्न करून घ्यायचे व जीवनात सुख, शांती, समाधान कसे प्राप्त करून घ्यायचे हे जाणून घेण्यासाठी ऐका,,,
हा वेबिनार….

WordPress Lightbox Plugin