वेबिनार १२

मागील वेबिनार मध्ये ऑफिस मध्ये कसे वागायचं, अंतर्मन, बहिर्मन म्हणजे काय ते पाहिले. या अंतर्मनाच्या शक्तीचा वापर आपण दैनंदिन जीवनात कसा करायचा हे आपल्याला या वेबिनारमध्ये जाणून घेता येईल.

एखादी गोष्ट अंतर्मनात रुजविण्यासाठी auto-suggestion स्वयंसूचना व hetero-suggestion या दोन techniques आहेत. स्वयंसूचनेने आपण अंतर्मनाला केलेल्या सूचना अंतर्मन ऐकत असते. म्हणून याबाबतीत आपण सावध असणे आवश्यक आहे. आपल्या सर्व सूचना, बोलणे सकारात्मक असले पाहिजे; कारण त्याला (reaction) प्रतिक्रिया देण्याचे काम अंतर्मन करत असते. आपण बोलतानाही फार काळजी घेतली पाहिजे. Customer, boss बद्दल बोललेल्या वाईट गोष्टी स्वत:साठी मारक ठरतात. अशाप्रकारे सकारात्मक गोष्टी नेमक्या कशा बोलाव्यात, सकारात्मक विचार कसा करावा हे विविध उदाहरणासहित श्री.प्रल्हाद पै समजावून सांगतात.

Hetero-suggestion म्हणजे दुसर्‍यांनी दिलेल्या सूचना. अनेक लोकांना पत्रिका पाहणे, वर्तमान पत्रातील भविष्य वाचणे यामध्ये फार रस असतो. यामुळे अनेक नकारात्मक विचार आपल्या मनात रुजतात. म्हणूनच भविष्य बदलायची ताकत जर आपल्यात नसेल तर भविष्य ऐकण्याचा भानगडीत पडू नये. अनेकदा gossiping मध्ये काही लोकं कंपनीबद्दल नकारात्मक बोलतात अशावेळी आपण gossiping पासून दूर राहावे. आजकाल सर्व ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकारण चालते व कामाच्या बाबतीत दुर्लक्ष होते. अशावेळी आपण ऑफिस मध्ये कसे काम करावे, वरिष्ठ, सहकारी व इतर सर्वांशी चांगले कसे वागावे याचे मार्गदर्शन श्री.प्रल्हाद पै वेबिनार मध्ये करतात.

अशाप्रकारे काम करताना सर्वांना सोबत घेऊन, कृतज्ञ राहून सर्वांचे कौतुक करत काम करावे. व सतत मनात सकारात्मक विचार घोळवत ठेवावेत. रात्री झोपताना बहिर्मनाला सतत ‘माझी दिवसेंदिवस अधिकाधिक प्रगति होत आहे.’ ही सकारात्मक सूचना द्यावी. याचे कारण समजून घेण्यासाठी पहा हा वेबिनार.

WordPress Lightbox Plugin