वेबिनार १

जीवनविद्या मिशनच्या विविध उपक्रमांमधील एक स्तुत्य उपक्रम म्हणजे ‘प्रल्हाद पै स्पीक्स’ हा वेबिनार. आपल्या राज्याचे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे साहेब यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. आपल्या देशाला ‘तरुणांचा देश’ असे संबोधिले जाते. भारत देशातील या 42 कोटी तरुणांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास ते देशासाठी विपत्ती ठरू शकतात. म्हणून या योग्य वयात मार्गदर्शन व सुसंस्कार मिळणे आवश्यक आहे.

विज्ञान तंत्रज्ञानाचा वेगाने विकास झाला; मात्र त्याचबरोबर अनेक वैयक्तीत, सामाजिक समस्याही निर्माण झाल्या. अनेकांना उच्च शिक्षण घेऊनही नोकरी नाही. सकाळी कामावर गेलेल्या माणसांची घरी येण्याची अनिश्चित वेळ, करिअरमध्ये पुढे जात असताना कुटुंबाकडे झालेले दुर्लक्ष, आरोग्यसमस्या, निराशा, ताण अशा अनेक समस्यांना आजच्या तरुणांना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे अशा परिस्थितीत यांना समतोल कसा साधायचा याचे मार्गदर्शन श्री.प्रल्हाद पै पुढील वेबिनर मधून करणार आहेत.

प्रत्येक तरुणाला स्वत:ची प्रगती व्हावी, असे वाटत असते. यात भौतिक व आधिभौतिक विकास (material & psycho spiritual development) यांचा समावेश असणे आवश्यक आहे. म्हणूनच विकासाबरोबर मानसिक सामर्थ्यही वाढले पाहिजे. अनेकजण करिअरमध्ये यश मिळावे म्हणून धडपड करतात मात्र त्या यशाबरोबर कौटुंबिक यशही तितकेच महत्वाचे आहे. हे सर्व मिळविताना शरीराची योग्य जोपासना करणे अनिवार्य आहे. जीवनातील विविध गोष्टीचा समतोल कसा साधायचा या बद्दल जीवनविद्या योग्य मार्गदर्शन करते.

सद्गुरू श्री.वामनराव पै यांनी निर्माण केलेली जीवनविद्या निसर्गनियमांवर अधिष्ठित, शाश्वत, धर्मातीत व कालातीत आहे. जीवन जगणे कला असून ती आत्मसात करणारा जीवनात कलावंत, यशवंत, भाग्यवंत व निवांत होतो. अशी ही जीवनविद्या stress enjoy कसा करायचा हे शिकवते.
Work life balance साधण्यासाठी श्री.प्रल्हाद पै पुढील चार गोष्टी या वेबिनरद्वारे सांगतात.
1) वेळेचे नियोजन.
2) नातेसंबंध जपणे.
3) सेवाभावी वृत्ती जोपासणे.
4) सर्वांना प्रेम देणे.

WordPress Lightbox Plugin