Events

सद्गुरु श्री वामनराव पै यांचे चतुर्थ दिव्य पुण्यस्मरण

” तुझे स्मरण तुझेच चिंतन सत्कर्माच्या पुण्य राशी, सद्गुरु तव मी कृपाअभिलाषी ….”

आपल्या सर्वांचे सुखनिदान सद्गुरु श्री वामनराव पै यांचे चतुर्थ पुण्यस्मरण २९ मे, २०१६ रोजी सकाळी १० ते १.३० या वेळात योगी सभागृह, स्वामी नारायण मंदिराच्या मागे, दादर पूर्व , मुंबई येथे आयोजित केले आहे.

या वेळात कार्यक्रमस्थळी उपासना यज्ञ, प्रार्थना जपयज्ञ व आगळ्या वेगळ्या पद्धतीने गीतांच्या माध्यमातून सद्गुरु स्मरणात आपण आपला सद्गुरु भाव प्रज्वलीत करीत सद्गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करणार आहोत.

जीवनविद्येला जगात पोहचविण्याचा प्रयत्न करताना एक नवी ऊर्जा मिळावी म्हणून मुंबई , कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह बेळगाव जीवनविद्येच्या सर्व शाखांमधील नामधारकांनी उपस्थित राहावे. नामधारकांनी येताना आपल्या चार चाकी वाहने आणण्यास हरकत नाही कार्यक्रमस्थळी वैलेट पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

सद्गुरु स्मरणात , सद्गुरु भावात प्रत्येक नामधारकांनी अंत्यत कृतज्ञतापूर्वक स्मरणांजली अर्पण करण्यास आवर्जून उपस्थित रहावे…