Samaj_Prabodhan_Achalpur

प्रगतीचे चार “प्र” मधूनच उत्कर्ष, उन्नती – श्री प्रल्हाद वामनराव पै

News Published by Lokmat​
अचलपूर बाजार समितीमध्ये उसळला ज्ञानसागर.
प्रगतीचे चार “प्र” मधूनच उत्कर्ष, उन्नती
– श्री प्रल्हाद वामनराव पै

आस असेल तर ध्यास लागतो, उत्कर्ष होतो
■ मुलांच्या सुप्त गुणांना वाव द्यावा
■ मुलांच्या आवडी-निवडी जोपासा
■ शिकणे आणि अभ्यास यात अंतर आहे, अभ्यासाशिवाय उत्कर्ष नाही
■ मला जे हवं, तीच समाजाची गरज असते, समाजाची गरज भागविण्यासाठी कर्तव्यबुध्दी कार्य करा
■ राष्ट्रहित आणि समाजहितासाठी कार्य केले पाहिजे उद्बोधन करताना प्रल्हाद वामनराव पै आणि समोर उपस्थित जनसमुदाय.

अचलपूर/परतवाडा : प्रगतीचे चार ‘प्र’ म्हणजे प्रयत्न, प्रेरणा, प्रेम व प्रार्थना आहेत. यामधूनच आपली उत्कर्ष व उन्नती होते, असा जीवन आनंदीत करण्याचा अमूल्य संदेश सदगुरू वामनराव पै यांचे सुपुत्र प्रबोधक प्रल्हाद पै यांनी दिला.
ते जीवन विद्या मिशनअंतर्गत हीरक महोत्सवानिमित्त अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणावर आयोजित समाज प्रबोधनाच्या ‘तुमचा उत्कर्ष, तुमच्या हातात’ या विषयावर शनिवारी सायंकाळी प्रबोधन करीत होते. यावेळी परतवाडा, अचलपूर या जुळय़ा नगरीतील शेकडो महिला पुरूष व नागरिक उपस्थित होते.

सदगुरू वामनराव पै यांचे विचार मागील ६0 वर्षांपासून समाजात मांडल्या जात आहे. जीवन जगण्यासाठी काय करायचे, आणि थोर मोठी मानस कशी झाले, असे अनेक उदाहरण प्रबोधक प्रल्हाद पै यांनी आपल प्रबोधनातून दिले.
संतांनी देशभक्ती व राष्ट्रभक्ती, स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. स्वच्छता ही बाहेरुन सुरू करुन आतपर्यंत आली पाहिजे. सदगुरू वामनराव पै यांनी आपले ६0 वर्ष अंधश्रध्दा निर्मूलनासाठी खर्च केले. सदगुरूंनी घरी बसून जीवनविद्या अवगत केली नाही. समाजाचे भले व्हावे यासाठी तयार केल्याचे प्रल्हाद पै यांनी सांगितले. पुढे उद्बोधन करताना पै म्हणाले, उत्कर्षासाठी सर्वजण हस्तरेषा बघतात, अशी लोकांना सवय आहे. वाईट नशिबावर आणि चांगले आपले असे म्हणणे चूक आहे. आपण विमानाने प्रवास करतो आणि अपघात झाला हा अपवाद आहे. शून्यातून मोठे झाले आहेत, कारण ते मोठे झालेत. त्यांच्यामध्ये जिद्द होती. प्रयत्न, पुण्य व संधी या सर्वांचा योग म्हणजे नशीब. यशासाठी पुण्याईची गरज लागते. अनुकूल परिस्थिती राहते तेव्हाच यश मिळते. वास्तववाद स्वीकारण्याचे आवाहन सदगुरूंनी केले. दैववाद सांगितला नाही. विकासवाद, उत्कर्ष आणि उन्नती जेव्हा हातात हात घालून जातील तेव्हाच विकास होतो, असे सदगुरूंनी सांगितले.

निद्रा आणि जागृती, प्रपंच आणि परमार्थ जीवनाच्या दोन बाजू आहेत. उत्कर्ष म्हणजे पैसा आपण त्यामागे धावतो हे चुकीचे आहे. उत्कर्ष हा एक प्रयत्न आहे. तो लहानपणाच्या सापसिडीसारखा असतो. उन्नती म्हणजे मनाचे उन्नयण होय, मनशुध्द करणे, शांत, निवांत कराल तर तन-मन उन्नत होईल. परमेश्‍वर म्हणजे कोणतीच मूर्ती नाही, परमेश्‍वर म्हणजे आनंद आहे. आपण तो घेत नाही. त्यामुळे सतत दु:ख सुरू राहते. दृष्टी बदलली की जीवनात आनंदच आनंद असतो, असे प्रबोधक प्रल्हाद पै यांनी सांगितले.

सौजन्य : लोकमत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *